Ad will apear here
Next
‘पडद्यामागे काम करणाऱ्यांचा सन्मान होतोय याचा आनंद’
कलासंस्कृती परिवारातर्फे ‘स्टार ऑफ स्क्रीन’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
कलासंस्कृती परिवारातर्फे ‘कलाकृतज्ञता पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना प्रदान करताना जॅकी श्रॉफ. शेजारी या वेळी अजिंक्य देव, रणजीतसिंह मोहिते पाटील, मृणाल कुलकर्णी, उल्हास पवार, मेघराज राजेभोसले, वैभव जोशी

पुणे : ‘आजवर मी प्रकाशात राहावे म्हणून माझ्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक लोकांचा आज सन्मान होत आहे, याचा मला आनंद आहे. देशभरातील लोकांनी माझ्या कामासाठी मला भरपूर प्रेम दिले. तुमचे हे प्रेम मला आधी कळले असते, तर मी याहूनही अधिक उत्तम काम केले असते,’ अशी भावना जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केली.

कलासंस्कृती परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘स्टार ऑफ स्क्रीन’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘कलाकृतज्ञता पुरस्कार’ गोखले यांनी स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कलासंकृती परिवाराचे अध्यक्ष वैभव जोशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कलासंस्कृती परिवाराचे उपाध्यक्ष माधव अभ्यंकर, मंगेश नगरे, सचिव विनय जवळगीकर, खजिनदार प्रवीण वानखेदे, रणजीतसिंह मोहिते पाटील, संजय ठुबे, राज काझी आदी मान्यवर उपस्थित होते.

हे या पुरस्कारांचे चौथे वर्ष होते. गोखले यांना ‘कलाकृतज्ञता पुरस्कार’, माजी आमदार व कला अभ्यासक उल्हास पवार यांना ‘समाज संस्कृती पुरस्कार’, किशोर पंडित, बाळासाहेब शिंदे आणि शुभांगी दामले यांना ‘निकोप सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेते अजिंक्य देव यांच्या हस्ते देण्यात आले.

या प्रसंगी चित्रपटाच्या पडद्यामागील तंत्रज्ञ कलाकारांना ‘स्टार ऑफ स्क्रीन’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये स्पॉट बॉय, सेटिंग बॉय, लाइट बॉय, ड्रेस मन, हेअर ड्रेसर, आर्टिस्ट कॉर्डीनेटर, प्रोडक्शन मॅनेजर, प्रोडक्शन असिस्टंट, पीआर, कॅमेरा असिस्टंट यांचा समावेश होता. त्यांना स्मृतिचिन्ह आणि दोन लाख रुपयांचा फॅमिली मेडिक्लेम विमा देण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जॅकी श्रॉफ यांनी आपल्या खास शैलीत पुणेकरांशी संवाद साधला. कलासंस्कृती परिवाराच्या पडद्यामागील कलाकारांचा सन्मान करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मल्लखांब, योगासने, नृत्य, स्कीट आदी विविध सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र मंडळाच्या मल्लखांबपटूनी प्रात्यक्षिके सादर केली. त्यांना विक्रम गोखले यांनी ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी पोफळे यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZVRBW
Similar Posts
‘कुटुंबाच्या पाठिंब्यानेच महिला होतील स्वयंसिद्धा’ पुणे : ‘आपल्यातील क्षमतांचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे हे दिवस आहेत. महिलांमध्ये उद्यमशीलता आहे. उद्योग उभारण्याच्या दृष्टीने सरकार पायाभूत सुविधा आणि इतर उपक्रम राबवित आहे. अशावेळी कुटुंबियांचा महिलांना पाठिंबा मिळाला, तर त्या अधिक सक्षम आणि स्वयंसिद्धा बनतील,’ असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले
थॅलेसेमियाग्रस्त मुलांना ‘राउंड टेबल’कडून मदत पुणे : पूना हॉस्पिटल येथे राउंड टेबल इंडियाची परिषद नुकतीच पार पडली. यात सुमारे १००हून अधिक शुभचिंतक आणि मान्यवर उपस्थित होते. राउंड टेबल इंडियामुळे चार थॅलेसेमियाग्रस्त मुलांना आयुष्याची एक नवी संधी मिळाली, ही त्यांची सेकंड इनिंग त्यांना ‘राउंड टेबल’मुळेच मिळाल्याने उपस्थित भारावून गेले.
‘स्मृतीवन’ कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांनी केले वृक्षारोपण पुणे : परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेडच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर अंतर्गत नुकतेच हिंजवडी येथील ‘ब्लू रिज’ मध्ये आणि भूगाव येथील ‘फॉरेस्ट ट्रेल्स’ येथे तब्बल एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले.
‘अभिनय म्हणजे आभास निर्मितीची कला’ पुणे : ‘अभिनय म्हणजे आभास निर्मितीची कला असून, अभिनय एवढा खोटा करायचा की तो खरा वाटला पाहिजे. ‘नकळत सारे घडले’ व ‘बॅरिस्टर’ ही नाटके करताना मला खूप मोठी आव्हाने होती; मात्र रंगमंच असो या चित्रपट स्वतःला झोकून देऊन काम करणे महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक विक्रम गोखले यांनी केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language